Sunday, November 7, 2010

अभ्यंग-ओघोळ

अभ्यंग-ओघोळ

सगळीकडे सुगंधच पसरलेला ,मिणमिणत्या मंद प्रकाशाने वातावरण प्रफुल्लीत झालेलं ,मीही अभ्यंगात न्हाऊन तयार झालोय नि ती कधी येईल याची वाट बघतोय....तिचा ओळखीचा सुगंध दरवळू लागतो.अभ्यंगात न्हाऊन तीही अभ्यंग ,इरकलीचा पदर डोईवर घेतलेला , तिची पावलं हळूहळू पडताहेत . ती येतेय हातात आरतीचं ताट घेऊन ,त्याची मंद आभा तिच्या चेहऱ्यावर पसरलीय.ती आरतीचं ताट माझ्यापुढे करते, तिची नजर अजून झुकलेलीच. तिच्या कपाळावरचे चंद्रलेणं चमचमतेय . माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे. मी अस्पष्ट ,अस्फुटसे बोलून जातो. ती दचकून बघते . मी हसतो तिच्याकडे बघून आणि तीही ...जाताना ती हळूच मागे बघते नि मला दिसते तिचं ओठांच्या कोपऱ्यातून उमललेलं हसू ....
__ एवढ्यात पणतीचा चटका बसतो मला . मी कावऱ्या-बावऱ्या नजरेने इथे तिथे बघतो.आई ओरडते ,'काय झालं रे?पणती पाडलीस वाटते .शुभ्दिनिसुद्धा धडपडला पाहीजेसच का?'...मी पडलेल्या पणतीकडे पाहू लागतो, त्याची विझून गेलेली वात आणि तेलाचा ओघोळ ..मी मनाशीच हसतो .

2 comments: