Tuesday, October 26, 2010

Ruthless..

Ruthless nights are coming,
i am holding my sigh
What would i do for u to gratify
Girl,i plunge into trans when nobody reply,

girl,
you left me as butterfly
i fight with my shadow
n winters lie

u left me alone
ma words go cry
girl, i remember my day,
so let me die

@bhavesh 'Kavya'

Friday, October 15, 2010

मनीचे काही...

आरस्पानी ,

अशी कित्येक होती म्हणून झटकली फुलपाखरे
ज्या पाखरावर जीव जडला ते होते आरस्पानी

गोड आठवांत जपलेले सारे मधाळ,मदहोश क्षण ,मी माझ्या नियतीच्या या कोलांट्या उडीवर आजही अचंबित आहे, तू ज्या अदेने आयुष्य स्पर्शले त्या अदेवर मी आजही फिदा आहे,
सारे क्षण मनाच्या सांदीकोपऱ्यात घट्ट जपून ठेवलेत सये ,कोंदणातल्या जडावासारखे! अगदी अनमोल,...
...मग एके दिवशी तुझे निघून जाणे पोरके करून मला..हा असा दर्द माझ्यासाठी नवीन ...मग ओल्या दिवसांत ओली जखम घेऊन जगणे माझे तुझ्याविना..साऱ्या सरींना साहत...
चालतेय आयुष्य नेहमीसारखेच...
आता ऋतू निघून जातात कसेबसे,दिवसहि हळूहळू...खुरडत रात्रीही निघून जातात , रोज सकाळी सकाळ होते, रात्री अंधार पडतो,चंद्र-सूर्यही काही यायचे थांबत नाहीत,बदलले असे काहीच नाहीय,सारे काही तसेच आहेत,तेच रस्ते,तीच वर्दळ ,मीही आपला तसाच रोज उठतो,तसाच दिवसभर बिझी असतो,दगदग होते आजही तेवढीच,संध्याकाळी मात्र आवर्जून तुझ्यासाठी वेळ काढतो,तुला भेटायचे असते ,कुठेही तू सांगशील तिथे,तुझ्या कॉलची वाट पाहतो,तुझा कॉलही लागत नाही,वाटते तू फोन करशील....
पण आठवणी पिंगा घालू लागतात अश्या संध्याकाळी , दिव्याभोवती फिरणाऱ्या पतंगासारख्या ..
तुझे सुंदर हसणे,मला हाक मारणे, मला ऐकणे ,असे सारे मी आठवत बसतो मग मी तासनतास...
मग मैफिलीतला शेवटचा चिराग ढळावा तश्या येणाऱ्या रात्री सये काळीज फाडून आत घुसतात ,
मग मी माझ्या पाकिटात ठेवलेली तुझी तस्वीर पाहतो ...
एकटक पाहत राहतो...तिरमिरीत उठतो ,मरणाआधी उठावे तसेच, तुझी चुंबने घेण्याआधी उठावे तसेच,आसक्त ....
कोपऱ्यातला मघाशी निजलेला दिवा पुन्हा जागवतो
अन रात्र रात्र तुझी वाट पाहतो......जळणाऱ्या वातीला जागते ठेवून...

@भावेश 'काव्या'

Thursday, October 14, 2010

गझल

(हि गझल लिहिताना मात्रांत बांधायचा प्रयत्न केला आहे,हा अजून एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आनंद देण्याचा ;आवडेल अशी खात्री बाळगतो)

किती लपावे अंधारी पण जगाचा नेम नाही
काटे बोचरे केतकीस अन अश्रूंचा थेंब नाही

जखमा दिल्यात त्यांनी जे घेऊन गेले स्वप्न
आता पाखरे परतीस पण स्वप्नांस भेट नाही

जगता आयुष्य माझे ,मी केवळ निमित्त
आता एवढे उपकार,पण जगण्या उमेद नाही

मदहोशी काय होती ,येथे हृदयास भंग
आता सावरे स्वत:स ,अन चंद्रास झोप नाही

जगले कित्येक निखारे पेटते सुन्न
आता पावले पेटती पण मनास खेद नाही

@भावेश 'काव्या'

Monday, October 11, 2010

मुक्त-गझल

मुक्त-गझल
( हि गझल पहिल्यांदाच ब्लॉगवर येतेय ,तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे,या पुढेही अश्याच गझला.कविता आणि बरेच काही येत राहील.टीकाही होऊ देत, नुसती स्तुती नको, आवडल्यास सारयापार्यंत ब्लॉग पोहचावा,वाचक हीच खरी संपत्ती आहे )
मी केवड्याचे दु:ख आज उमजून बसलो
दूर सुगंधाला जाताना पाहूनही हसलो

तुझे काफिर दिवाने हे शहर माझे
तुझी मंदिरे पाहून पायरीशीच बसलो

केव्हा येईल माझे आयुष्य परत
आज सरणावर मांडून पायघड्या बसलो

घे कवेत माझे गुन्हे अभागी
तेवढेच तुझ्या माथी पाप देऊन बसलो

कोण श्वास गळी उतरला माझ्या
हा तेव्हाही सोहळा,जेव्हा शेवटचे हसलो

तुझे दु:ख भावेश,त्या पारध्यास कळाले
त्याच्या आधी छातीत बाण रोवून बसलो

@भावेश 'काव्या'

Saturday, October 9, 2010

आरस्पानीस,


कळ्या तिने वेचल्या
काल धुंद केतकी ,
आज केशरी धुमारे
-बघून ती लाजली

आसवांनी माझ्या माझे
शब्द भिजले
शब्दांचेच श्रेय सारे
माझे अश्रूदेखील हसले


@भावेश'काव्या'

Thursday, October 7, 2010

चारोळ्या -आरस्पानी

@'भावेश' 'काव्या'

चारोळ्या -
१.चिंब चिंब मी ,
तिने मागे वळून पाहिले एकवार
शिरशिरी तिच्या अंगात
प्रेम दाटले असे अलवार


२.मला चंद्राची उपमा
देण्यात तुझा मोठा कावा होता
चंद्रावरही डाग आहेत
हे सांगण्याचा तुझा तो दावा होता


३.जगायचे आहे तर
मग 'पतंग ' होऊन बघ
निमिषात जगण्याचा
उद्देश कळतो मग

४.झालीत शांत सारी
आज दु:खे माझी
सरणावर आज
शांत नीज माझी

५.पानांवाचून फुललेले झाड
खरेच बिचारे वाटते
सुगंध कितीही दाटला
तरी ओकेबोके वाटते


@'भावेश' 'काव्या'

आरस्पानीस मनापासून

Sunday, October 3, 2010

तहानलेले घर माझे ...

तहानलेले घर माझे तुझ्या बरोबरल्या पावसासाठी
काहूर वेदनांचे घेउन येते प्रत्येक उन,
मी गोतावल्यात निर्जिवांच्या
ह्रुदयाचे ठोके मोजत बसतो
अन सुसाट वारा पश्चिमेचा माझे घर शहारून टाकतो,...

मी वेड़ा ,उगाच छंदी
फान्द्यापानान्त लपलेले क्षण शोधतो,
क्षण चार ओलखींचे चार अनोलखी वेचून ठेवतो

कुपीन्च्या कुपी अत्तराचे फाये आकाश पसरवतो,
मंद गारेगार झुलूकिबरोबर
अन मी कसाबसा हसतो
............. सुंगंधाची किम्मत द्यावी लागेल म्हणून .....

@भावेश