Showing posts with label gazal. Show all posts
Showing posts with label gazal. Show all posts

Thursday, October 14, 2010

गझल

(हि गझल लिहिताना मात्रांत बांधायचा प्रयत्न केला आहे,हा अजून एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला आनंद देण्याचा ;आवडेल अशी खात्री बाळगतो)

किती लपावे अंधारी पण जगाचा नेम नाही
काटे बोचरे केतकीस अन अश्रूंचा थेंब नाही

जखमा दिल्यात त्यांनी जे घेऊन गेले स्वप्न
आता पाखरे परतीस पण स्वप्नांस भेट नाही

जगता आयुष्य माझे ,मी केवळ निमित्त
आता एवढे उपकार,पण जगण्या उमेद नाही

मदहोशी काय होती ,येथे हृदयास भंग
आता सावरे स्वत:स ,अन चंद्रास झोप नाही

जगले कित्येक निखारे पेटते सुन्न
आता पावले पेटती पण मनास खेद नाही

@भावेश 'काव्या'

Monday, October 11, 2010

मुक्त-गझल

मुक्त-गझल
( हि गझल पहिल्यांदाच ब्लॉगवर येतेय ,तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे,या पुढेही अश्याच गझला.कविता आणि बरेच काही येत राहील.टीकाही होऊ देत, नुसती स्तुती नको, आवडल्यास सारयापार्यंत ब्लॉग पोहचावा,वाचक हीच खरी संपत्ती आहे )
मी केवड्याचे दु:ख आज उमजून बसलो
दूर सुगंधाला जाताना पाहूनही हसलो

तुझे काफिर दिवाने हे शहर माझे
तुझी मंदिरे पाहून पायरीशीच बसलो

केव्हा येईल माझे आयुष्य परत
आज सरणावर मांडून पायघड्या बसलो

घे कवेत माझे गुन्हे अभागी
तेवढेच तुझ्या माथी पाप देऊन बसलो

कोण श्वास गळी उतरला माझ्या
हा तेव्हाही सोहळा,जेव्हा शेवटचे हसलो

तुझे दु:ख भावेश,त्या पारध्यास कळाले
त्याच्या आधी छातीत बाण रोवून बसलो

@भावेश 'काव्या'