Tuesday, April 16, 2013

'रानमेवा … '




( माझ्या आगामी पुस्तकातील काही भाग. )

घरापासून पाचेक मिनटावर करवंदीचा झाप होता , हि अशी टपोरी मोठी करवंदे घोसाघोसाने लगडायची . अन आम्ही पोरे अर्ध्या चड्डीत अख्खी वखार फिरत असू … उन्हातान्हात. कैऱ्या पाड . अर्धे पिकलेले आंबे पाड . बारीक बारीक जांभळे आखुडीने हलवून पाड … जे मिळेल ते . कुठल्या झाडाला चांगले आंबे येतात ते हुडकून काढ , पळसाची -पंगाऱ्याची पाने तोडून त्याचे द्रोण बनव , त्यात करवंदे भर. एखादे राजनाचे झाड शोध आणि त्याची पिवळी -तांबूस रंगाची, पांढऱ्या गोड चिकाने भरलेली फळे तोडत , काठीने मारून मारून खजरीची फळे गोळा करत, हेकलाची चार-दोन फळ चोखून त्याच्या बिया किती विषारी असतात याची वर्णनं ऐकत त्या तोंडाने थुकत जेव्हा सर्व खिशात आणि मावत नाही म्हणून शर्टाच्या ओटीत जेव्हा दोन-तीन आंबे , मुबलक जांभळं -करवंद ,खजरं घेऊन शाळेच्या व्हरांड्यात फरशीवर जेव्हा आम्ही वाटणी करत असू तेव्हा जो काहीतरी मिळवल्याचा आनंद असे तो आता विकत घेऊन खाल्लेल्या 'रानमेव्याला ' नाही … आता तो रानमेवा गोळा करण्याचा आनंद नाही .आता त्या स्पेशल चकरा नाहीत स्पेशल फळ खाण्यासाठी स्पेशल जागेवरले  स्पेशल झाड शोधण्यासाठी … आता फक्त अर्ध्या चड्डीतल्या पोरांनी आणलेल्या मेव्यातनं काहीतरी  मिळतंय का यासाठी त्यांच्या मिनतवाऱ्या करणं … 

@~भावेश~ 

No comments:

Post a Comment