Monday, October 11, 2010

मुक्त-गझल

मुक्त-गझल
( हि गझल पहिल्यांदाच ब्लॉगवर येतेय ,तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे,या पुढेही अश्याच गझला.कविता आणि बरेच काही येत राहील.टीकाही होऊ देत, नुसती स्तुती नको, आवडल्यास सारयापार्यंत ब्लॉग पोहचावा,वाचक हीच खरी संपत्ती आहे )
मी केवड्याचे दु:ख आज उमजून बसलो
दूर सुगंधाला जाताना पाहूनही हसलो

तुझे काफिर दिवाने हे शहर माझे
तुझी मंदिरे पाहून पायरीशीच बसलो

केव्हा येईल माझे आयुष्य परत
आज सरणावर मांडून पायघड्या बसलो

घे कवेत माझे गुन्हे अभागी
तेवढेच तुझ्या माथी पाप देऊन बसलो

कोण श्वास गळी उतरला माझ्या
हा तेव्हाही सोहळा,जेव्हा शेवटचे हसलो

तुझे दु:ख भावेश,त्या पारध्यास कळाले
त्याच्या आधी छातीत बाण रोवून बसलो

@भावेश 'काव्या'

2 comments:

  1. khupach chaan... farach awadali..

    ReplyDelete
  2. भावेश, अभिमान आहे आम्हा सर्व दोस्तांना तुझा कि ह्या स्वरुपात तुझ्या कविता आम्हांस आस्वाद घेण्यास मिळत आहेत,
    तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हास ही लेखांची अन कवितांची मेजवानी सतत मिळत राहो ही विनंती, धन्यवाद !!!

    ReplyDelete